Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: चाकुर / Chakur District: लातुर / Latur Gender: F | वयः ६५ मुलगेः ३ मुलीः २ व्यवसाय ः शेती चांगली पिकते. या वर्षीच धान्य त्या वर्षीपर्यंत पुरते. घरची परिस्थितीः खाऊन पिऊन सुखी आहेत. मागच्या वर्षी एका मुलीचा नवरा दिंडी करून गेला व घरी पोचल्यावर अचानक वारला ते मोठ दुःख आहे. म्हणून गाणी म्हणु नये अस वाटत. गाणी पुष्कळ येतात. गिरण्या येण्या आगोदर सारखा दळायचा सराव होता. गणगोतावरच्या असोत, शेती पोतावरच्या असोत वा देवाच्या असोत गाणी भरपूर लक्षात आहेत. दुःख बाजुला ठेवून गाणी सांगीतली. एकदा सांगायला लागल्यावर त्यात त्यांचे मन रमले. या १५ व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पायी पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. त्यांची मुलाखत व ओव्या १५ तारखेस घेतल्या. त्या निवृत्तीमहाराज राजुरकरांच्या दिंडीत येतात. त्या संभाजी पुलापासल्या खंडुजीबाबा मंदीरात उतरल्या होत्या. | ||