Cast: मराठा / Maratha Village: दासखेड / Daskhed Taluka: पाटोदा / Patoda District: बीड / Beed Gender: F | वयः ५० मुलगेः ३ मुलगीः १ व्यवसाय ः शेती जिरायत घरची परिस्थितीः माहेरची गरीबी होती. सासरी फार सासुरवास सहन केला आहे.आता एक मुलगा भोसरीत रहातो, एक औरंगाबादला असतो, एक घरी शेती करतो. पूर्वी वासकरांच्या दिंडीबरोबर जायच्या. यावर्षीपासून बोधले महाराज, डकसळ यांच्या दिंडीत सामील झाल्या आहेत. या १५ व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पायी पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. तेंव्हा त्यांची मुलाखत व ओव्या घेतल्या. या बोधले महाराजांच्या दिंडीत आहेत. मराठवाडा मित्र मंडळ मधे त्यांची दिंडी उतरली होती. | ||