Cast: मराठा / Maratha Village: दासखेड / Daskhed Taluka: पाटोदा / Patoda District: बीड / Beed Gender: F | वयः ५५ मुलगे ः २ मुलगीः १ व्यवसाय ः शेती थोडी आहे. शेतमजुरी करावी लागते. एक सून नांदत नाही. सुनेला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलाचे दुसरे लग्न करावे तर घटस्फोट घ्यावा लागेल. कोर्टाचा खर्च परवडत नाही. स्वतः फार सासुरवास सोसला आहे. सासु मोलाची दळण घ्यायची त्यामुळे दळण पुष्कळ दळले. दळणावरली गाणी म्हणूनच येतात. पूर्वी सतत दळत. आता दळण दळत नाही तरी गाणी लक्षात आहेत कुठे घरची परिस्थिती ः अार्थिक परिस्थिती नाजुक आहे. मुले मजुरीच करतात. मुलीला सुध्दा मजुरीच करावी लागते. तिचे सासरघर पण अार्थिक परिस्थितीने दुबळे आहे. या १५ व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. तेंव्हा त्यांची मुलाखत व ओव्या घेतल्या. या बोधले महाराजांच्या दिंडीत आहेत. मराठवाडा मित्र मंडळ मधे त्यांची दिंडी उतरली होती. दिंडीला रू३०० भरावे लागतात. ते नाहीत. मग दिंडीचा स्वैपाक करून दिंडीत सामील झाल्या. दिंडीत मजुरी करून पैसे फेडतात. स्वैपाक करायचा असल्याने या ट्रकमधून जातात. पायी जात नाहीत | ||