Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: कोळवण / Kolwan Gender: F | वयः ४० शिक्षणः नाही मुलगेः २ मुली ः२ माहेरः नांदगाव व्यवसायः शेती ३ एकर. २ बैल आहेत. पिकं तांदूळ, गहू. १० पोती भात होतो. जोडधंदाः कोंबड्या पाळणे. सासरी आल्यावर शेजारणीकडून गाणी शिकले. हळद दळताना, घावणीला तांदूळ दळताना गाणे म्हणते. लेकाची, भावाची आठवण आल्यावर, मुलाला खेळवण्यासाठी गाणे म्हणते. मनात विच्छा झाली चार शब्द म्हणांव तर गाणं म्हणते. तो एक मूडच असतो. गाणं ऐकल्यावर त्यावेळीस सारखं गिरवित राहायचे. येळेनुसार गाणं तयार करुन म्हणते. लेकावर, लेकीवर, देवावर गाणे तयार करते. एखाद्या टायमाला शब्द बदलुन म्हणल्याशिवाय शेजारणीला गाणी शिकवायची. दुसरे गाणं ऐकायला येतात. ज्यांना गाणं येत नाही त्यांना गाणं यायला पाहिजे. हल्लीची पोंर लक्ष देत नाही पर त्यांनी ते शिकावं . भजनाच्या गळ्याला विशिष्ट चाल आहे. जो लक्षात येईल तो गळा म्हणते. घरची परिस्थिती ः घर ३खणी पे दगडात बांधलेले आहे. एकत्र कुटुबं असून एक सून,नातू आहेत. खाऊन पिऊन सुखी कुटुंब आहे. वेल आहेत. १९९६ ला मुलाखत घेतली. | ||