Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: कोळवण / Kolwan Gender: F Songs by Durge Hira (19) | वयः ४५ शिक्षणः ४थी मुलेः १ मुलीः ६ माहेरः मालं व्यवसायः शेती १एकर. पिकं तांदूळ,गहू जोडधंदाः कोंबड्या पाळणे ओव्या माहेरी शिकले. आईचं ऐकायचं ते लक्षात राहिलं. देवाहून,बहिणीवरुन भावंडाहून,मालकाहून,दुबाळवाडीहून (माहेरची वाडी) गाणी ऐकायची. तीच ध्यानात ठेवायची. ११ व्या वर्षी लग्न झाले.जावांना गाणे शिकविले. पहाटेच्या वेळी गाणे म्हणायच्या. एकादस असली तर वरई दळताना, घावरीचं पीठ दळताना, लग्नाला गाणे म्हणायचे. मनातच समसमी असते त्यामुळे जात्यावर बसंल की म्हणावसं वाटतं. इरीशीरीला बायका असल्या की गाणे म्हणायला आवडते.देवाची गाणी, मुलाचं, भावाचं, मालकाहून ,आईहून, बापाहून गाणी येतात. सगळे विषय ज्या त्या येळेला आवडतात. मुलावर लई जीव आहे. जात्यावर बसंल की हृदय उकलतं. मग देवाचं काढायचं म्हणजे सगळ समसमान हुईल. मनाने गाणे तयार करते. केव्हाही असं बसंल की गाणे तयार करते. पांडुरंगावर, मुलावर गाणं तयार करते. एखाद्याचं शब्द ऐकलं की मन उच मारते आणखी नवीन शब्द जोडते. गाण उचाऊन म्हणते. दुसर्यांना, शेजारणीला गाणे शिकवते. यांच्या मोठाल्या मुली गाणी म्हणतात. गाणे म्हणायला लागले की इतर जण गाणं ऐकायला येतात. ज्यांना गाणं म्हणता येत नाही त्यांना काही म्हणता येत नाही याबद्दल त्यांना दोष देते. एखाद्याच्या मनाची श्रध्दा असते ते गाणं म्हणतात. ज्यांना आवड नाही म्हणून ते लक्ष देत नाही. आता रेडिओ ,पेपर निघाले ह्या गाण्यांना कोण इचारतं ? घरची परिस्थिती ः घर ३ खणाचे असून कुडाच्या भिंती आहेत. विभक्त कुटुंब असून आर्थिक परिस्थिती जेमतेम. एकुलता एक मुलगा वेड्यासारखे वागतो. त्यामुळे आई खचली आहे. करणी झाल्याची भिती व्यक्त करतात. घराभोवती फळभाज्या (तसेच) लावल्या आहेत १९९६ ला मुलाखत घेतली. | ||