Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: सोनपेठ / Sonpeth District: परभणी / Parbhani Gender: F | मुलगाः २ मुलगीः नाही व्यवसाय ः शेती या प्रभावती भोसले यांच्या मुलगी व सुनीता सातपुते यांच्या बहीण आहेत. यांची मुलाखत व गाणी २२.११.२००० आळंदी येथे घेतली. कार्तीकी एकादशी निमित्त त्या यात्रेच्या वेळी आल्या होत्या. या प्रभावती भोसले यांच्या मुलगी व सुनीता सातपुते यांच्या बहीण आहेत. यांची मुलाखत व गाणी २२.११.२००० आळंदी येथे घेतली. कार्तीकी एकादशी निमित्त त्या यात्रेच्या वेळी आल्या होत्या. त्यांना दोन मुलगे आहेत. त्यातील एक सासुकडे शिक्षणासाठी आहे व एक यांच्याकडे असतो. त्यांना पाच एकर जमीन आहे . यांची जमीन दुसर्याला कसण्यासाठी देतात. हा शिमगा ते तो शिमगा (वर्ष) असे वर्षाला पाच हजार रुपये देणे. जरी शेतात काही नाही झाले तरी पाच हजार रुपये देणे असे बांधुन घेतले आहे. नवरा एकटाच आहे. सासु सासरे शिसेगावाला असतात. कामासाठी इकडे आले आहेत. आळंदीला राहातात. चौघी बहिणी व दोन भाऊ आहेत. भाऊ लहान आहेत. | ||