Cast: मराठा / Maratha Village: वांगी / Vangi Taluka: करमाळा / Karmala District: सोलापूर / Solapur Gender: F | वय: ३० महाळा हे जुन्या पध्दतीचे नाव ते आवडत नाही, दुसर्याला लवकर कळत नाही म्हणून नाव मालन आहे असे सांगतात. यांना पुष्कळ जात्यावरच्या ओव्या येतात. त्या म्हणाल्या आम्ही गवी लग्नाची हळद असो वा इतर कोणता इतर कार्यक्रम असो रात्र रात्र गाणी म्हणतो. अजून नागपंचमीला फेर धरतो. फेराची सुध्दा पुष्कळ गाणी यतात. यांना ओव्या सांगायचा उत्साह होता. पण दिंडीतील महाराजांनी आदेश दिला की बायांनी फेर धरा म्हणून. त्याचे या बाईंवर दडपण आले. पण इतर बायांनी सावरून घेतले. त्या बाया म्हणाल्या की आम्ही जातो फेर धरायला. या ओव्या सांगतील.मग त्यांनी ओव्या सांगितल्या. यांना आम्ही २४.७.१९९९ला पंढरपुर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी भेटलो व ओव्या घेतल्या. | ||