Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: बार्शी / Barshi District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः६५ शिक्षणः नाही. मुलगाः १ मुलीः ३ शेतीः सहा एकर. आता पाच एकर पाण्याने भिजेल. अजून शेतात पाणी पोहोचले नाही. पाणी आल्यावर ऊस करणार. कोरडवाहू मधे बाजरी, हुलगा, तूर, मूग मटकी अशी पिके घेतात.आता स्वतःला शेती होत नाही. नवर्याने सगळा बैल बारदाना विकून टाकला. अर्धेलीनी शेती करुन घेतो.तरी घरात एक म्हैस व एक गाय ठेवली आहे. घरची परिस्थीती ः मुलगा शिक्षक आहे. मुलगा मधी मदत करतो. शेती अर्धेलीनी देण्याच्या आधी मुलगा शेतीत पाणी धरत होता तर मोटरचा शॉक लागला. या अपघातानी मुलाचे मन स्थिर नाही. काळजी वाटते. या बाई म्हतार्या आहेत. दिंडीत कस चालवणार याचीपण त्यांना चिंता लागली होती. लहानपणी मावशीची गाणी ऐकली ती पाठ झाली. घरच्या निरनिराळ्या काळजांमुळे गाणी आठवत नाहीत असे सांगत होत्या. ७व ८ जुलै १९९९ ला पुणे येथे आषाढी वारी बरोबर पंढरपूरला चालल्या होत्या. पालखीबरोबर पुण्यात मुक्कामाला होत्या तेंव्हा मुलाखत व ओव्या घेतल्या | ||